वर्तमान लेखक-कवींमध्ये खुलेपणा, दिलदारपणा राहिलेला नाही. वेगवेगळी निमित्ते आणि कारणं पुढे करून कोतेपणालाच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जाते

कधी साहित्याच्या दर्जाचं निमित्त केलं जातं, कधी विचारांची बांधिलकी पुढं केली जाते, कधी कुणी जाणून-बुजून निरपेक्ष राहणार असेल, तर त्याला कुणीकडे तरी ओढलं जातं किंवा ढकललं जातं. तत्त्वाच्या गप्पा मारत वचावचा भांडणाऱ्यांच्या भांडणापाठीमागे निव्वळ स्वार्थ उभा असल्याचं दिसतं. प्रसिद्धी, पुरस्कार, अभ्यासक्रम, लोकमान्यता असल्या शूद्र गोष्टींसाठी गट तयार करून खुन्नस धरले जातात, बिभत्स राजकारणही केलं जातं........

आपल्या भोवतालाची उंची वाढवली नाही, तर आपली उंची कोसळू शकते. म्हणूनच निदान आपल्या स्वार्थासाठी का होईना, आपला भोवताल आपण घडवायला हवा

मित्रहो, आपले पगार आपल्या आवश्यक गरजा भागवण्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विद्येच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना इतर धंदा, व्यवसाय, प्लॉटिंग, ट्यूशन करण्याची गरज नाही. हवं तर विद्यार्थ्यांना मोफत शिकवायला हरकत नाही. आपण ज्या गावात राहतो, ते गाव आणि गावातलं वातावरण सुसंस्कृत असेल, तर त्यात आपण अधिकची भर घालायला हवी. आपल्यासारखे वाचणारे, लिहिणारे, ऐकणारे, रसिकजन आपल्याभोवती निर्माण करणं, ही आपली जबाबदारी असते.......

‘रानमळ्याची वाट’ हा प्रकल्प करताना श्रावणीने एकाही कवितेला हातात कागद घेतला नाही, चुकली-अडखळली नाही, तिचा आत्मविश्वास ढळला नाही…

गेले नऊ महिने सुरू असलेला श्रावणीचा संपर्क आता थांबणार, त्यामुळे हूरहूर वाटतेय. नऊ महिन्यांपूर्वी नावगावही माहीत नसलेली ही माणसं अचानक काळजात जाऊन बसली. एप्रिलच्या मध्यावर आम्ही ही कवितामालिका थांबवत आहोत. पण कुठंतरी थांबलंच पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांचं औत जिथं थांबतं, तिथं आम्ही थांबत आहोत. अर्थात पुढंही आम्ही गप्प बसणारच नाही. तीन-चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर असाच काहीतरी जिव्हाळ कार्यक्रम घेऊन येणार आहोत.......

हा कवी स्वत:ला केवळ दलित कवी म्हणवून घेत नाही. त्याला एकूणच मानवतेचा कवी व्हायचंय. म्हणूनच मनवर यांची कविता हे दलित कवितेतलं ‘युगप्रवर्तन’ आहे

ज्याची चूक त्याच्या पदरात घालूनही चूक करणाराविषयी मनातून करुणाच बाळगणारा हा कवी आहे. हे या कवीच्या बुद्धत्वाकडच्या प्रवासाचं लक्षण आहे. दलित कवितेत याआधी हे कधी दिसलं नव्हतं. हाच दलित कवितेचा आवर्तभंग आहे. भाषेच्या उदरात शिरून तिच्यात दडलेल्या आणि आतापर्यंत कुणीच न सांगितलेल्या अर्थाला मुखर करण्याची प्रतिज्ञा कवी खरी करून दाखवतो. म्हणूनच त्याला जात्याची नव्हे तर आईनं गाईलेल्या गाण्यांची घरघर ऐकू येते.......